SAYALI EXPOSES SACHIN-SAKSHI AFFAIR
esakal
THARALA TAR MAG SERIAL UPDATE: ठरलं तर मालिकेत सध्या नवनवे ट्वीस्ट येताना पहायला मिळताय. अशातच आता मालिकेत सायली एका कॅफेमध्ये साक्षी शिखरे आणि अस्मिताच्या नवऱ्याला मिठीत बघते. साक्षीला पाहून सायलीला मोठा धक्का बसतो. कारण साक्षीचा तुरुंगात जीव गेला असं सगळ्यांना माहित असतं. सायलीला तिचा विश्वासघात झाल्याचं समजतं. तसंच सचिन सुद्धा अस्मिताचा विश्वासघात करत असल्याचं तिच्या लक्षात येतं. त्यामुळे ती लगेच रेकॉर्ड करण्यासाठी फोन काढते. त्या दोघांना पकडायला जाणार तोच दोघे गाडीतून पळ काढतात.