
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता अमित भानुशाली प्रेक्षकांचा लाडका आहे. तो 'ठरलं तर मग' या मालिकेतून घराघरात पोहोचला. 'ठरलं तर मग' ही मालिका गेले २ वर्ष टीआरपी यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. अमित यापूर्वीही काही मालिकांमध्ये दिसला होता. मात्र या मालिकेने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. तो मालिकेत अर्जुन सुभेदार हे पात्र साकारताना दिसतोय. या मालिकेतील अभिनयासाठी त्याचं प्रचंड कौतुक होतंय. मात्र आता अमितबद्दल एक महत्वाची माहिती समोर आलीये. अर्जुन हा दिवसाच्या २- २ नोकऱ्या करत असल्याचं समोर आलंय. तो अभिनयासोबतच कॉर्पोरेट क्षेत्रातही काम करतोय.