

tharla tar mag actors in local train.
ESAKAL
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' मधील सगळेच कलाकार प्रेक्षकांचे आवडते आहेत. या मालिकेतील सायली आणि अर्जुनसोबतच इतर कलाकारही प्रचंड लोकप्रिय आहेत. असेच मालिकेतील २ कलाकार नुकतेच मुंबई लोकलने प्रवासाला निघाले होते. विशेष म्हणजे त्या दिवशी लोकलमध्ये दहीहंडी साजरी करण्यात येत होती. सुंदर असं भजन गात होते आणि हे दोन्ही कलाकार त्यात मिसळले. हे कलाकार म्हणजे मालिकेतील चैतन्य म्हणजेच चैतन्य सरदेशपांडे आणि अश्विन म्हणजे प्रतीक सुरेश. आता एक पोस्ट करत चैतन्यने त्यांना आलेला सुंदर अनुभव सांगितलाय.