
'ठरलं तर मग' ही मालिका प्रेक्षकांची अत्यंत आवडती मालिका आहे. ही मालिका गेले २ वर्ष टीआरपी यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेतील एकही पात्र आजवर बदललेलं नाही. मालिकेचे निर्माते कलाकारांना त्यांच्या परीने अभिनय करण्यासाठी शिफ्टचे टायमिंग बदलून देतात. असंच काहीतरी अभिनेत्री मोनिका दबडे हिच्यासोबत घडलं. मोनिकाने काही महिन्यांपूर्वी मालिकेतून ब्रेक घेतला होता. तिने दोन महिन्यांपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर तिने २ महिन्यातच मालिकेत परतण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वीच मालिकेत तिचं पुनरागमन झालंय. मात्र मोनिका तिच्या २ महिन्याच्या चिमुकल्या बाळाला घेऊन सेटवर येते. हे मुळीच सोपं नसल्याचं तिने सांगितलंय.