
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' मालिकेने गेली २ वर्ष टीआरपी यादीत टॉप केलंय. आता या मालिकेत मोठमोठे ट्विस्ट येत आहेत. जुलै महिन्याच्या अखेरीस प्रदर्शित झालेल्या भागांमध्ये 'वात्सल्य आश्रम मर्डर केस'चा सत्याच्या बाजूने निकाल लागला आणि अर्जुनला यश मिळालं. मालिकेतील दोन्ही प्रमुख खलनायिका साक्षी, प्रिया यांना शिक्षा सुनावण्यात आली आणि मधुभाऊ निर्दोष सुटले. या संपूर्ण ट्रॅकने प्रेक्षकांना टीव्हीसमोर खिळवून ठेवण्याचं काम केलं. यामुळेच 'ठरलं तर मग' ने टीआरपी यादीत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केलीये. या मालिकेने ९.१ TVR मिळवलं असून २.७ कोटी प्रेक्षक ही मालिका पाहत होते. आता मालिकेत आणखी एक ट्वीस्ट येणार आहे. मालिकेत अर्जुनाचा अपघात झाल्याचं दाखवण्यात आलं आहे.