

THARLA TAR MAG NEW EPISODE
ESAKAL
'ठरलं तर मग' ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे. गेले कित्येक वर्ष ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. त्यात मालिकेत अनेक ट्विस्ट येत आहेत ज्यामुळे प्रेक्षकांची मालिका पाहण्याची उत्सुकता टिकून आहे. आता मालिकेत पुढे अनपेक्षित ट्विस्ट येणार आहे. 'ठरलं तर मग'मध्ये सध्या सचिन आपल्या बहिणीला फसवत असल्याचं सत्य अर्जुनसमोर आलंय. त्यामुळे तो चांगलाच संतापलाय. आजच्या भागात अर्जुन सचिनचा पाठलाग करताना दिसणार आहे. तो सचिनचा पाठलाग करून त्याला ओढतच हॉटेलबाहेर घेऊन येणार आहे. स्वतःच्या गाडीत बसवून तो थेट त्याला स्वतःच्या ऑफिसमध्ये नेणार आहे.