
tharla tar mag update
ESAKAL
'ठरलं तर मग' मालिकेत सध्या भलताच ट्रॅक सुरू आहे. मुख्य मुद्दा बाजूला राहून वेगळ्याच दिशेला कथा वळवण्यात आलीये. गेली २ वर्ष ही मालिका टीआरपी यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. असं असताना आता मालिकेत पुढची कथा दाखवण्याऐवजी उगीच पाणी टाकून वाढवण्याचं काम सुरू आहे असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. एकीकडे सायली अर्जुनच्या मागे फिरताना दिसतेय. तर दुसरीकडे प्रिया कोर्टातून निर्दोष सुटली आहे. त्यामुळे आता प्रिया घरी परत येणार आहे.