
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' सध्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. गेली २ वर्ष ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. टीआरपी यादीतही ही मालिका पहिल्या स्थानावर आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. सायली- अर्जुनसोबतच मालिकेतील इतर पात्रही प्रेक्षकांची आवडती आहेत. अशातच २ महिन्यांपूर्वीच मालिकेतील अस्मिता म्हणजेच अभिनेत्री मोनिका दबडे हिने चाहत्यांना गुड न्यूज दिलेली. मोनिका लवकरच आई होणार आहे. आता तिचं डोहाळेजेवण पार पडलंय.