

priya from tharla tar mag
ESAKAL
'ठरलं तर मग' ही मालिका गेले कित्येक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. या मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांचा आवडता आहे. नायक नायिका असो किंवा खलनायक खलनायिका प्रत्येकजण आपली जबाबदारी निष्ठेने पार पाडतंय. त्यामुळेच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीये. यातील खलनायिकेचं पात्र साकारणारी अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर ही देखील प्रेक्षकांची आवडती आहे. मात्र तिच्या आईने ही मालिका पाहणं आता बंद केलंय. असं का? याबद्दल प्रियाने एका मुलाखतीत सांगितलंय.