आईच खऱ्या तन्वीला नकळत मदत करणार; प्रतिमाच्या त्या गोष्टीमुळे सायलीला आणखी एक सत्य समजणार, 'ठरलं तर मग'मध्ये ट्विस्ट

THARLA TAR MAG NEW EPISODE UPDATE: 'ठरलं तर मग' मालिकेत आता नवीन ट्विस्ट आलाय. सायलीला तिच्या भूतकाळातील आणखी एक गोष्ट आठवणार आहे.
THARAL TAR MAG NEW UPDATE

THARAL TAR MAG NEW UPDATE

ESAKAL

Updated on

'ठरलं तर मग' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलंय. गेली २ वर्ष ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. सध्या मालिकेत निरनिराळे ट्विस्ट येताना दिसतायत. काही दिवसांपूर्वीच प्रियाचे सगळे कारनामे सगळ्यांसमोर उघड झाले. तिला जेलची हवाही खावी लागली. त्यानंतर अस्मिता आणि तिच्या नवऱ्याचा ट्रॅक सध्या मालिकेत सुरू आहे. मात्र त्यासोबतच आणखी एक ट्रॅक सुरू आहे तो म्हणजे सायलीला तिचा भूतकाळ आठवण्याचा ट्रॅक. सायलीचा खरी तन्वी आहे हे सत्य मधुभाऊंना माहीत आहे मात्र ते कोमात आहेत. तर नागराज आणि महीपत हे सत्य माहीत असूनही कुणाला सांगणार नाहीत. अशात आता हे सत्य समजणार कसं असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय. मात्र आता मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com