

tharla tar mag upcoming episode
esakal
छोट्या पडद्यावर गेली ३ वर्ष टीआरपी आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी लोकप्रिय मालिका म्हणजे 'ठरलं तर मग'. एका अपघाताने तन्वी किल्लेदारांपासून दुरावते. मधुभाऊंच्या आश्रमात राहायला जाते. पण नशीब पुन्हा तिला त्याच घरात घेऊन येतं. अर्जुनशी तिचं लग्न होतं आणि ती सुभेदारांची सून म्हणून घरात येते. मात्र तेव्हा कुणालाच ती खरी तन्वी आहे हे सत्य ठाऊक नाहीये. आता तीन वर्षानंतर सायलीने ती स्वतः तन्वी असल्याचं शोधून काढलंय. मधुभाऊंना तिने याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनीही तिचं खरी तन्वी असल्याचं सांगितलं. आता मालिकेतलं सगळ्यात मोठं सत्य सुभेदार आणि किल्लेदारांसमोर येणार आहे.