
'ठरलं तर मग' मालिकेत सध्या मोठे ट्विस्ट येत आहेत. या मालिकेने गेले २ वर्ष टीआरपी यादीत आपलं पहिलं स्थान कायम ठेवलंय. त्यात मालिकेत नुकताच प्रिया आणि साक्षी यांना शिक्षा सुनावण्यात आलीये. त्यामुळे सुभेदार दुखावले गेलेत. तर किल्लेदारदेखील प्रियावर रागावलाय. रविराजने त्याच्या लाडक्या लेकीची केस न लढण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता प्रिया कशी सुटणार असा प्रश्न नागराजसमोर आहे. मात्र अश्विन आपल्या बायकोला सोडवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतोय. अशातच आता मालिकेत जे प्रेक्षकांना अपेक्षित होतं तेच घडणार आहे.