THARLA TAR MAG
esakal
THARLA TAR MAG VIEWERS SAY, “AFTER THREE YEARS, THE TRUTH IS FINALLY OUT”: स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेत सध्या वेगवेगळे वळण येताना पहायला मिळताय. मालिकेत सध्या मोठा ट्वीस्ट आलेला आहे. खरी तन्वी दुसरी तिसरी कोणी नसून सायलीच असल्याचं स्पष्ट झालय. प्रियाला अटक झाल्यानंतर सायली तिच्या भूतकाळाचा शोध घेत असते. दरम्यान त्यातच तिला सुभेदारांच्या घरात एका लहान मुलीचे भास होऊ लागतात. सायलीला तिच्या सवयींमध्ये तन्वीच्या सवयीमध्ये साम्य दिसते. दरम्यान ती मधुभाऊंना रडत रडत भुतकाळाबद्दल विचारते, तेव्हा मधुभाऊ डोळ्यांनी सायलीच खरी तन्वी असल्याचे संकेत देतात.