

ACTRESS EXIT FROM THARLA TAR MAG
ESAKAL
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' गेली दोन वर्ष टीआरपी यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेचा ट्रॅक आणि मालिकेतील कलाकार दोन्हीही प्रेक्षकांचे आवडते आहेत. या मालिकेतील नायक नायिका जितके प्रेक्षकांचे आवडते आहेत तेवढेच मालिकेचे खलनायकदेखील लोकप्रिय आहेत. नागराज, महीपत शिखरे, साक्षी शिखरे, प्रिया यांची खलनायकी गँग मिळून सायली आणि अर्जुनला त्रास देत असतात. मात्र आता मालिकेत पुन्हा मोठा बदल दाखवण्यात येणार आहे. मालिकेतील साक्षी शिखरे हे पात्र साकारणारी अभिनेत्री पुन्हा एकदा बदलणार आहे.