'हॉस्पिटलचा खर्च परवडत नाही वाटतं!' सायलीची झाली थेट कोर्टातच डिलिव्हरी, 'ठरलं तर मग'चा प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले

THARLA TAR MAG SAYALI DELIVERY IN COURT: 'ठरलं तर मग' मालिकेत सध्या कोर्टरूम ड्रामा पाहायला मिळतोय. अशातच मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये सायलीची कोर्टातच डिलिव्हरी झाल्याचं दाखवण्यात आलं आहे.
THARLA TAR MAG SAYALI DELIVERY

THARLA TAR MAG SAYALI DELIVERY

esakal

Updated on: 

SAYALI AND ARJUN BECOME PARENTS IN THARLA TAR MAG:'ठरलं तर मग' मालिकेत सध्या कोर्ट रुम ड्रामा पहायला मिळतोय. आश्रमातील मुलींना गायब केल्याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु असते. यावेळी मुलींसाठी सायली ठामपणे तिची मतं मांडताना पहायला मिळतेय. यावेळी कोर्टात सायलीनं केलेला युक्तीवाद प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. तिने आपल्या युक्तीवादातून स्त्री सुरक्षेचा संदेश देण्याचा तिने प्रयत्न केलाय. यावेळी तिने आपली बाजू मांडत समाजासमोर जगाच्या मानसिकतेचा प्रश्न उपस्थित केलाय. दरम्यान या सगळ्यात सोशल मीडियावर 'ठरलं तर मालिकेतील' एक क्लीप व्हायरल होतोय. त्या क्लिपमध्ये सायली कोर्टातच बाळाला जन्म देणार आहे. तर दुसरीकडे प्रियाला जेलमध्ये प्रसुती कळा सुरु झालेलं दाखवण्यात आलंय. सध्या सोशल मीडियावर मालिकेचा प्रोमो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

Loading content, please wait...