

tharala tar mag new twist
esakal
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' मध्ये दिवसेंदिवस नवनवीन ट्विस्ट येत आहेत. सायली आणि अर्जुन यांच्यावरील संकटं संपण्याचं नाव घेत नाहीयेत. गेले काही महिने सायली कोर्टात स्वतःची केस स्वतःच लढतेय. त्यात ती गरोदर असल्याचंदेखील दाखवण्यात आलंय. आता अखेर सायलीचं बाळ या जगात येणार आहे. सुभेदारांच्या घरात आनंदी आनंद येणार आहे.मात्र सालीची डिलिव्हरी हॉस्पिटलमध्ये होणार नाहीये. या मालिकेचा नवीन प्रोमो पाहून प्रेक्षक पुन्हा एकदा स्टार प्रवाहाच्या लेखकांवर संतापले आहेत.