

tharla tar mag big twist
esakal
'ठरलं तर मग' या मालिकेने गेले तीन वर्ष टीआरपी यादीत आपलं पाहिलं स्थान कायम ठेवलंय. मात्र गेले काही दिवस मालिका संपणार आहे का असे प्रश्न प्रेक्षक विचारत होते. त्याचं कारण म्हणजे मालिकेत सायलीच खरी तन्वी असल्याचं सत्य समोर आलं होतं. त्यानंतर महीपतचं कारस्थान, प्रियाचा खोटेपणा, नागराजने घडवून आणलेला अपघात सगळंच समजलं होतं. त्यामुळे मालिकेत पुढे काय दाखवणार याची उत्सुकता प्रेक्षकांना होतीच. आता मालिकेत आजवरचा सगळ्यात मोठा ट्विस्ट आलाय. १ ऑगस्टपासून मालिकेचं संपूर्ण कथानक बदलणार आहे. असं नेमकं काय घडणार आहे?