

JUI GADKARI
ESAKAL
'ठरलं तर मग' ही मालिका प्रेक्षकांची अत्यंत आवडती मालिका आहे. गेले ३ वर्ष ही मालिका टीआरपी यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. यातील सायली आणि अर्जुन यांची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. सध्या ही मालिका ४५ मिनिटं दाखवली जातेय. याआधी एक भाग ३० मिनिटांचा असायचा. त्यासाठीच कलाकारांना तब्बल १२- १२ तास काम करायला लागायचं. मात्र आता ४५ मिनिटांच्या एपिसोडसाठी कलाकारांना आणखी मेहनत करावी लागतेय. कलाकारांसोबत तंत्रज्ञ आणि दिग्दर्शक तर त्याहूनही जास्त मेहनत करतात. आता जुईने स्वतः त्यांच्या जेवणाबद्दल सांगितलं आहे.