
'ठरलं तर मग' ही मालिका आता अतिशय रंजक वळणावर आलीये. या मालिकेत कोर्टाने अर्जुनला मधुभाऊंच्या केससाठी फक्त ३० दिवस दिले होते. त्यामुळे अर्जुन हात धुवून त्यांच्या मागे लागला. अखेर अर्जुनच्या हाती काही ठोस पुरावे लागले होते. ज्यामुळे त्याने साक्षी विलासच्या खुनाच्या दिवशी वात्सल्य आश्रमातच होती हे सिद्ध केलं. आता अर्जुनने महिपतच्या आणखी एका माणसाला साम दाम दंड भेद वापरून स्वतःच्या बाजूने करून घेतलंय. हा माणूस म्हणजे इन्स्पेक्टर सरंजामे. सरंजामे अर्जुनला साक्षीविरोधातला एक मोठा पुरावा देतो. जो अर्जुन कोर्टात सादर करतो.