

STAR PRAVAH NEW SERIAL hero
esakal
स्टार प्रवाहवर नुकत्याच दोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. एक 'लपंडाव' आणि दुसरी 'नशीबवान' या दोन्ही मालिका पहिल्याच भागात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्यात. त्यात 'लपंडाव' मालिकेत अभिनेता चेतन वडनेरे मुख्य भूमिकेत आहे. चेतन यापूर्वी स्टार प्रवाहावरील 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसला होता. या मालिकेतील त्याची भूमिकाही चांगलीच गाजली होती. आता चेतन 'लपंडाव' मालिका गाजवायला सज्ज झालाय. मात्र कधीकाळी चेतनकडे स्टार प्रवाहचे हेड सतीश राजवाडे यांनी दुर्लक्ष केलेलं. तो किस्सा चेतनने 'लपंडाव' मालिकेच्या ट्रेलर लाँच दरम्यान सांगितलाय.