

lalita pawar
esakal
आजही मंथरा म्हटल्यावर केवळ ललिता पवार यांचाच चेहरा डोळ्यांसमोर येतो. आपल्या शारीरिक वैगुण्यालाच आपली ताकद बनवून त्यांनी भारतीय सिनेसृष्टीत आपले एक वेगळं स्थान निर्माण केलं. रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेत त्यांनी साकारलेली 'मंथरा' ही व्यक्तिरेखा अजरामर झाली. मात्र कधीकाळी ललिता या मुख्य अभिनेत्रीच्या भूमिका साकारत होत्या. एका प्रसंगाने त्यांचा संपूर्ण जीवन बदलून टाकलं. एका अभिनेत्याने कानशिलात लागावल्यामुळे त्यांना कायमचं अपंगत्व आलं. ज्याचा त्याच्या करिअरवर तर काहीच फरक पडला नाही. मात्र ललिता यांना सगळ्या प्रोजेक्टमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.