

SUSHMITA SEN
ESAKAL
आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावणारी लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे सुष्मिता सेन. आज १९ नोव्हेंबर रोजी सुष्मिताचा वाढदिवस आहे. ती ४९ वर्षांची झालीये. सुष्मिताचं बॉलिवूड करिअर चढ उतारांनी भरलेलं होतं. मात्र आता ती लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. मिस युनिव्हर्सचा किताब जिंकल्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये आपलं करिअर बनवायचं ठरवलं. आजही ती आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. मात्र तुम्हाला तो प्रश्न माहितीये का ज्याने सुष्मिताला मिस युनिव्हर्स बनवलं.