

the kerala story 2
ESAKAL
लोकप्रिय दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या 'द केरला स्टोरी'ने प्रेक्षकांना एका वेगळ्या गोष्टीवर विचार करायला भाग पाडलं होतं. केरळ मधील मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचं धर्मांतरण करणं या विषयावर हा चित्रपट होता. मात्र यावरून बरेच वाद झाले होते. हा चित्रपट प्रोपोगंडा फिल्म असल्याचं सांगितलं गेलं. आता लवकरच 'द केरला स्टोरी २' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. भीती, राग आणि सत्य या तीन गोष्टींनी भरलेला 'द केरला स्टोरी 2: गोज बियॉन्ड' चा टीझर आधीपेक्षाही गंभीर आहे.