Pushpa 2 The Rule : पुष्पाचा रॉयल लूक आणि भन्नाट हूकस्टेप ; सिनेमाचं पहिलं गाणं झालं रिलीज

Pushpa 2's first song released on social media : बहुचर्चित 'पुष्पा २ द रूल' सिनेमाचं पहिलं गाणं सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. गाण्यातील पुष्पाचा लूक आणि हुकस्टेप चर्चेत आहे.
Pushpa 2 first song released
Pushpa 2 first song released

Pushpa 2 First Song Released : बहुप्रतीक्षित सिनेमा 'पुष्पा द रुल'ची चर्चा सगळीकडे आहे. सिनेमाचं पोस्टर असो किंवा टीझर किंवा अल्लू अर्जुनचा लूक सगळीकडे व्हायरल झालाय आणि 'पुष्पा २: द रुल' सिनेमाचं पहिलं गाणं सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. पुष्पाचा जयघोष या गाण्यात पाहायला मिळतोय.

सोशल मीडियावर रिलीज झालेल्या या गाण्याची चर्चा सध्या सगळीकडे असून या गाण्याच्या व्हिडिओमध्ये पुष्पाच्या वाढलेल्या साम्राज्याची, त्याच्या बदललेल्या लूकची झलक पाहायला मिळतेय.

'पुष्पा २: द रुल' मध्ये आता अल्लू अर्जुनचा लूक कसा असेल याची छोटीशी झलकही या गाण्यात पाहायला मिळाली. गोल्डन कलरचे हायलाईट्स, सिल्कचे प्रिंटेड शर्ट्स, पँट्स, गळ्यात हातात दागिने आणि क्लासिक शूज अशा वेगळ्या अंदाजात आता पुष्पा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याशिवाय पुष्पाचं चिन्हही यावेळी गाण्यात दाखवण्यात आलं. हाताचा उलटा पंजा ही पुष्पाची निशाणी आणि त्याच्या गँगचा झेंडा याची झलक या गाण्यात पाहायला मिळाली.

लाल चंदनाची तस्करी करताना सगळ्या विरोधकांवर मात करत पुष्पाने स्वतःचं मोठं साम्राज्य उभारलं आहे, त्याची आर्थिक परिस्थिती बदलली आहे आणि तो गोरगरिबांना मदत करतो हे या गाण्यातून अधोरेखित करण्यात आलं. एकूणच पुष्पाच्या सिक्वेलमध्ये काय पाहायला मिळणार याची छोटीशी झलक या गाण्यात दाखवली गेली.

Pushpa 2 first song released
Pushpa 2: सहा मिनिटांच्या सीनसाठी 60 कोटी खर्च, एकूण बजेट किती? रिलीजपूर्वीच किती झालं वसूल? पुष्पा-2 बद्दल जाणून घ्या सर्वकाही

मिका सिंग आणि नकाश अजीझ यांनी गाण्याचं हिंदी व्हर्जन गायलं असून रॉकस्टार डीएसपी यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. तर गाण्यात अल्लू अर्जुनने केलेली हूकस्टेपसुद्धा लवकरच व्हायरल होणार आहे याचा अंदाज गाणं पाहून येतोय.

पहा संपूर्ण गाणं:

कधी रिलीज होणार पुष्पा २?

सुकुमार यांचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा १५ ऑगस्ट २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना यांच्यासोबतच फहाद फाझील, जगदीश भंडारी, प्रकाश राज यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

या सिनेमाच्या पहिल्या पुष्पराज नावाच्या सामान्य तरुणाची लाल चंदनाच्या तस्करीत सामील होण्याची ते तस्करीच्या साम्राज्याचा राजा होण्याची गोष्ट पाहायला मिळाली आणि आता दुसऱ्या भागात पुष्पाच्या साम्राज्यात येणाऱ्या अडचणी, त्याच्या विरोधकांवर त्याने केलेली मात तसंच एसपी शेखावत आणि पुष्पा यांच्यातील संघर्षाची गोष्ट पाहायला मिळणार आहे.

तर पुन्हा एकदा अभिनेता श्रेयस तळपदे पुष्पा सिनेमाच्या हिंदी व्हर्जनसाठी अल्लू अर्जुन साकारत असलेल्या पुष्पराज या भूमिकेला आवाज देणार आहे.

Pushpa 2 first song released
Pushpa 2 Teaser : स्टायलिश स्टार अल्लू अर्जुनची ढांसू अ‍ॅक्शन.. बहुप्रतिक्षित 'पुष्पा-2' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com