

the narmada story
esakal
द नर्मदा स्टोरी हा चित्रपट केवळ एक रहस्यपट किंवा गुन्हेगारी पट नाही तर तो कायदा-सुव्यवस्थेसारख्या गंभीर प्रश्नावर आणि आजच्या समाज व्यवस्थेवर खरमरीत भाष्य करणारा आहे. दिग्दर्शक झैगम इमाम यांनी ही कथा सुंदररीत्या गुंफली आहे. कथेतील रहस्य शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात ते यशस्वी झाले आहेत. रहस्याची उत्तम गुंफण त्यांनी केली आहे. त्यामुळे चित्रपट उत्कंठावर्धक झाला आहे. या चित्रपटाची कथा मध्य प्रदेशातील नर्मदा भागात घडणाऱ्या रहस्यमय घटनांभोवती आणि त्यामागील सत्याभोवती फिरणारी आहे.