
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'नवरी मिळे हिटलरला' आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. काही दिवसात या मालिकेचे शेवटचे भाग प्रसारित होणार आहेत. त्यातही ही मालिका बंद होणार म्हणून प्रेक्षक नाराज आहेत. झी मराठीच्या गाजलेल्या मालिकांपैकी एक असलेली ही मालिका आता बंद होणार आहे. 'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका फार कमी वेळेत प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली. या मालिकेने प्रेक्षकांना भुरळ पाडली. झी मराठी पुरस्कार सोहळ्यात या मालिकेने अनेक पुरस्कार जिंकले होते. या मालिकेची आगळी वेगळी कथाही प्रेक्षकांना भावली होती. आता मालिकेत शेवटच्या भागात नेमकं काय घडणार याचे व्हिडिओ समोर आलेत.