कलापूरचा पुन्हा विषयच हार्ड! एका महिन्यात कोल्हापूरच्या दिग्दर्शकांचे तीन सिनेमे प्रदर्शित; बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांना घातली भुरळ

एक काळ असा होता की, मराठी सिनेमा (Marathi Cinema) म्हटले की, फक्त आणि फक्त कोल्हापूर असेच चित्र होते.
Marathi Film
Marathi Filmesakal
Summary

पाच जुलैला आता सुमित पाटील निर्माता आणि दिग्दर्शक असलेला ‘विषय हार्ड’ हा सिनेमा झळकणार आहे. अस्सल कोल्हापुरी कथा आणि संवादाबरोबरच या सिनेमात सुमित मध्यवर्ती भूमिकेत आहे.

कोल्हापूर : एक काळ असा होता की, मराठी सिनेमा (Marathi Cinema) म्हटले की, फक्त आणि फक्त कोल्हापूर असेच चित्र होते. पण, मध्यंतरीच्या काळातील मरगळ झटकून आता तरुणाई पुन्हा नव्या जोमाने कार्यरत झाली आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांत सिनेक्षेत्रातील ‘ब्लॅक लेड’ अर्थात फिल्मफेअर पुरस्कारावर कलापूरची मोहोर उमटवल्यानंतर आता पूर्ण लांबीचे सिनेमा घेऊन ही तरुणाई सज्ज झाली आहे. एका महिन्यात कोल्हापूरच्या दिग्दर्शकांचे तीन सिनेमे प्रदर्शित होत आहेत.

प्रदर्शनापूर्वीच विविध फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक पुरस्कारांची लयलूट केलेला आणि 'कान्स' फेस्टिव्हलमध्ये वर्ल्ड प्रिमिअर झालेला ‘गाभ’ (Gabh Film) हा सिनेमा २१ जूनला प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवरही या सिनेमाने प्रेक्षकांना भुरळ घातली. मुळातच ‘गाभ’ हा शब्दच नव्या पिढीला माहिती असण्याची शक्यता कमी आहे आणि तेथूनच सिनेमातील रंजकता उलगडत राहते.

Marathi Film
माणूस आणि प्राण्यांमध्ये नातं विणणाऱ्या 'गाभ'ने जिंकली का प्रेक्षकांची मनं? वाचा रिव्ह्यू

म्हैस, रेडा, म्हशीची ‘प्रेग्नेंशी‘ कशी होते, तिचं माजावर येणं म्हणजे काय असतं, या साऱ्या प्रक्रियेत या जनावरांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या माणसांच्या मनाची घालमेल कशी होत असते, हा सारा प्रवास या सिनेमातून उलगडत राहतो आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे तो विविध सामाजिक प्रश्‍नांवरही भाष्य करत राहतो. लेखक आणि दिग्दर्शक म्हणून अनुप जत्राटकर यांनी ही भट्टी नक्कीच चांगली जमवली आहे.

मात्र, अगदी अनपेक्षितपणे एकाच आठवड्यात हा सिनेमा थिएटरमधून उतरवला गेल्याने प्रेक्षकांची निराशा झाली. पण, आता हा सिनेमा ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. बारा जुलैला कोल्हापूरचाच दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांनी दिग्दर्शित केलेला ‘बाई गं’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिनेमात स्वप्नील जोशी मुख्य अभिनेता असून, वेगवेगळ्या वयोगटांतील तब्बल सहा अभिनेत्रींबरोबर तो दिसणार आहे. सुकन्या मोने, प्रार्थना बेहेरे, आदिती शारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान, सागर कारंडे अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात आहे.

Marathi Film
लेखक-दिग्दर्शक अनुप जत्राटकरांचा प्रेरणादायी प्रवास! प्रदर्शनापूर्वीच 36 राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या 'गाभ'ची कशी झाली निर्मिती?

मुंज्या, चंदू चॅम्पियन...!

‘मुंज्या’ (Munjya Movie) हा हॉरर कॉमेडी हिंदी सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. त्यातील मुख्य बालकलाकार आयु‍ष उलगडे हा उचगावचा असून, येथील शिंदे ॲकॅडमीतून त्याने अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे. ‘चंदू चॅम्पियन’ हा सिनेमाही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. १९७२ ला जर्मनीमध्ये झालेल्या पॅरालिंपिक स्पर्धेमध्ये भारताला जलतरणातील पहिले सुवर्णपदक मिळवून देणारे मुरलीकांत पेटकर यांच्या चरित्रावर हा सिनेमा बेतला आहे आणि पेटकर हे मूळचे पेठ-इस्लामपूरचे आहेत.

निर्माता, दिग्दर्शक अन् लीड रोलही..

पाच जुलैला आता सुमित पाटील निर्माता आणि दिग्दर्शक असलेला ‘विषय हार्ड’ हा सिनेमा झळकणार आहे. अस्सल कोल्हापुरी कथा आणि संवादाबरोबरच या सिनेमात सुमित मध्यवर्ती भूमिकेत आहे. त्याच्या जोडीला पर्ण पेठे ही कसलेली अभिनेत्री असून, सिनेमाच्या ट्रेलरपासून गाणी, टिझर, पोस्टर अशा सर्वच पातळ्यांवर या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. तशी ही नेहमीची प्रेमकथा नसली तरी नायक-नायिकेसमोर वेगळीच परिस्थिती येते. बारा वर्षांचे प्रेम त्यांना पाच तासांत वाचवायचे असते आणि त्यातून उडणारा हास्यकल्लोळ मग अनुभवायला मिळतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com