

Tighi Marathi Movie Teaser Out
esakal
Marathi Entertainment News : आई आणि मुलींचं नातं हे केवळ रक्ताचं नसून, ते अनुभव, आठवणी, संस्कार आणि न बोललेल्या भावनांनी विणलेलं असतं. कधी अतूट जिव्हाळ्याचं, तर कधी न व्यक्त झालेल्या अपेक्षांमुळे निर्माण झालेल्या अंतराचं… तरीही अंतर्मनाने कायम एकमेकांशी घट्ट बांधलेलं. या नात्याच्या अशाच नाजूक, हळुवार आणि खोल छटा उलगडणारा ‘तिघी’ हा आगामी मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाचा भावस्पर्शी टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांच्या मनाला अलगद स्पर्श केला आहे.