

Tighee Movie Premier
esakal
Marathi Entertainment News : जीजिविषा काळे दिग्दर्शित ‘तिघी’ चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून सध्या चित्रपटाची टीम विविध थिएटर्सना भेट देत आहे. यादरम्यान प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून कलाकारही भारावून जात आहेत. अनेक ठिकाणी चित्रपटाचे शोज हाऊसफुल्ल होत असून थिएटर्समध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसत आहे. चित्रपट पाहाताना प्रेक्षक पूर्णपणे कथेत गुंतून जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.