

Tighee Movie Cast Run Cloud Kitchen For Day
esakal
Marathi Entertainment News : जीजिविषा काळे दिग्दर्शित 'तिघी' हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर, नेहा पेंडसे -बायस, सोनाली कुलकर्णी यांच्या तिघींच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कणखर, स्वाभिमानी आणि भावविश्वाने समृद्ध स्त्रिया अशा या 'तिघी' पडद्यावर जशा दिसतात, तसाच प्रत्यय अलीकडे प्रत्यक्ष आयुष्यातही आला.