
Entertainment News : सोनी टेलिव्हिजनवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या ऐतिहासिक मालिकेचा ‘चकवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ (Chakravarti Samrat Prithviraj Chauhan) हा प्रोजेक्ट फक्त एक मालिका नाही, तर इतिहासाचा भव्य आणि जिवंत अनुभव ठरणार आहे. या मालिकेसाठी १० एकर जागेवर उभारलेला सेट हे याचे ठळक उदाहरण आहे — एक असा भव्य दृष्य अनुभव जो १२व्या शतकाच्या भारतात घेऊन जातो.