हॉलीवूड अभिनेता टॉम क्रुजचा खूप दिवसापासून प्रतिक्षेत असलेला 'मिशन इन्पॉसिबल द फाइनल रेकनिंग' लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे 'मिशन इम्पॉसिबल'च्या चाहत्यांना चित्रपटाबाबत उत्सुकता लागली आहे. दरम्यान 'कान' फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाचं प्रीमियर शो पार पडला. या प्रीमियरमध्ये लोकांनी स्टॅन्डिंग ओवेशन देत चित्रपटाचं आणि टॉम क्रूज कौतूक केलय. या चित्रपटात टॉम क्रूज यांनी खतरनाक स्टंट केले आहेत.