सध्या जगप्रसिद्ध असलेला अभिनेता टॉम क्रूझचा 'मिशन इम्पॉसिबल- द फायनल रेकनिंग' नुकताच प्रदर्शित झालाय. या चित्रपटाची भारतात मोठी क्रेझ आहे. त्यामुळे 7 दिवस आधी हा चित्रपट भारतात प्रदर्शित करण्यात आला. पुढील आठवड्यात हा चित्रपट अमेरिकेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने टॉम क्रूझने भारताप्रती प्रेम व्यक्त केलय.