TOXIC
esakal
TOXIC MOVIE YASH DOUBLE ROLE PERFORMANCE REVIEW: केजीएफ स्टार यशच्या 'टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स' या चित्रपटाची बी टाऊनमध्ये चांगलीच चर्चा रंगलेली होती. त्याच्या चित्रपटाची त्याचे चाहते कित्येक दिवस वाट पाहात होते. चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर पाहिल्यानंतर सगळ्यांची उत्सुकता ताणलेली होती. कन्नड आणि इंग्रजी भाषेमध्ये एकाच वेळी चित्रित झालेला हा चित्रपट आता हिंदी, तमीळ, तेलगू, मल्याळम या भाषांमध्ये सगळीकडे भव्य स्तरावर प्रदर्शित झाला आहे. खणखणीत आणि दमदार संवाद, धडाकेबाज आणि थरारक अशी अॅक्शन, स्टाईल आणि ग्लॅमर यांनी भरलेला अशा हा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये कियारा अडवानी, रुक्मिणी वसंत, नयनतारा, हुमा कुरेशी, तारा सुतारिया अशा अभिनेत्री काम करीत असल्या आणि त्यांनी उत्तम अभिनय केला असला तरी संपूर्ण चित्रपटाची धुरा स्टाईलबाज अभिनेता यशने आपल्याच खांद्यावर घेतली आहे. दिग्दर्शिका गीतू मोहनदास यांनी या कथेची मांडणीच तशा प्रकारे केली आहे.