

tula pahta
esakal
"प्रेम कसं करायचं हे अनेक जण शिकवतात, पण ते विसरायचं कसं, हे कोणीच सांगत नाही..." याच भावस्पर्शी ओळींवर आधारित 'तुला पाहता' हा नवा कोरा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार सतीश पुळेकर आणि इला भाटे ही जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे.