देवाला घातलेली आर्त साद ; ‘तुंबाडची मंजुळा’मधील ‘देवा मला पाव की रे’ हे भावस्पर्शी गाणं प्रदर्शित

Tumbadchi Manjula Movie New Song Out : तुंबाडची मंजुळा सिनेमातील देवा मला पाव की रे हे गाणं नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं. सई ताम्हणकरवर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे.
देवाला घातलेली आर्त साद ; ‘तुंबाडची मंजुळा’मधील ‘देवा मला पाव की रे’ हे भावस्पर्शी गाणं प्रदर्शित
Updated on

Marathi Entertainment News : झी स्टुडिओजच्या बहुचर्चित ‘तुंबाडची मंजुळा’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच उत्सुकता आहे. रहस्य, थरार आणि वेगळ्या कथानकामुळे चर्चेत असलेल्या या चित्रपटातील आता आणखी एक खास आणि मनाला भिडणारं गाणं ‘देवा मला पाव की रे’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं भावविश्वाला स्पर्श करत थेट मनात घर करणारं आहे. सई ताम्हणकरवर चित्रित या गाण्यात ईश्वराकडे मनापासून केलेली प्रार्थना, संकटाच्या काळात देवाकडे धाव घेणाऱ्या मनाची आर्त हाक आणि श्रद्धेची भावनिक गुंफण या गाण्यातून अनुभवायला मिळते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com