‘ती’ आली… आणि सगळ्यांचा उडाला थरकाप! ‘तुंबाडची मंजुळा’चं भन्नाट पोस्टर प्रदर्शित

Tumbadchi Manjula Poster Out : तुंबाडची मंजुळा सिनेमाचं नवीन पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. जाणून घेऊया या सिनेमाविषयी आणि रिलीज डेटविषयी.
Tumbadchi Manjula Poster Out

Tumbadchi Manjula Poster Out

esakal

Updated on

Marathi Entertainment News : झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या तुंबाडची मंजुळा या चित्रपटाचं नवीन पोस्टर सोशल मीडियावर प्रकाशित झालं असून तो सध्या चर्चेचा विषय बनलं आहे. लाल साडी आणि पैंजणाने सजलेलं एका स्त्रीचं भारदस्त पाऊल जे गावाच्या आणि गावकऱ्यांच्या दिशेने पडतंय आणि ते बघून भेदरलेले गावकरी पळ काढतायत अशी भन्नाट संकल्पना या पोस्टरमधून मांडण्यात आली आहे. या सगळ्या गोंधळात एक भन्नाट कॉमिक टचही जाणवतो. यावरून हा चित्रपट केवळ घाबरवणार नाही, तर प्रेक्षकांना खळखळून हसवणार असल्याचेही स्पष्ट होतंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com