ती आली, तिने पाहिलं अन् जिंकून घेतलं सारं! ब्लॉकबस्टर ठरली तुंबाडची मंजुळा! दोन आठवड्यांत इतक्या कोटींची कमाई

TUMBADCHI MANJULA BOX OFFICE COLLECTION : थिएटरमध्ये जाणारा प्रेक्षक जेवढा खळखळून हसतोय तेवढाच अंतर्मुख होऊन बाहेर पडतोय आणि हीच या चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे.
tumbadchi manjula box office collection

tumbadchi manjula box office collection

esakal

Updated on

ती आली , तिने पाहिलं आणि तिने सारं काही जिंकून घेतलं हे वर्णन जिच्यासाठी चपखल लागू होईल ती कलाकृती म्हणजे 'तुंबाडची मंजुळा'. झी स्टुडिओजची निर्मिती, विविध कोरगांवकर यांचं दिग्दर्शन सोबतीला एकाहून एक मातब्बर कलाकारांची फौज, उत्कंठावर्धक आणि तेवढंच मजेशीर कथानक, कर्णमधुर संगीत, निसर्गसंपन्न कोकणाचे दर्शन, आणि संपूर्ण कुटुंबाचं मनोरंजन करणाऱ्या या चित्रपटाने केवळ दोनच आठवड्यांत कमाईचा १५ कोटींचा टप्पा पार केला आहे. मुंबई पुण्यासह अवघ्या महाराष्ट्रभर झळकणारे हाऊसफुलचे बोर्ड, समीक्षकांकडून मिळालेली पसंतीची पावती, प्रेक्षकांकडून येणाऱ्या कौतुकाच्या प्रतिक्रिया, सोशल मीडियावर सामान्य प्रेक्षकापासून ते इन्फ्लुएन्सर्समध्ये निर्माण झालेली क्रेझ यातूनच चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर यशाची प्रचिती येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com