

tuzya sobatine
ESAKAL
छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. तर दोन आठवड्यापूर्वी स्टार प्रवाहवर 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' ही मालिका सूरू करण्यात आली. त्यापाठोपाठ १९ जानेवारी रोजी आणखी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आलीये. ती म्हणजे 'तुझ्या सोबतीने' या मालिकेत अभिनेत्री ऐतशा संझगिरी आणि अभिनेता अजिंक्य ननावरे मुख्य भूमिकेत आहेत. तर प्रेक्षकांची लाडकी खलनायिका माधवी निमकर याही मालिकेत नकारात्मक भूमिकेत आहे. नुकताच या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. पाहूया हा भाग त्यांना कसा वाटलाय.