

rubina dilaik
ESAKAL
'छोटी बहू' बनून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री रुबिना दिलैक ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध चेहरा आहे. या मालिकेने तिला घराघरात लोकप्रियता मिळवून दिली. तिचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. रुबिना सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती वैयक्तिक आणि व्यवसायिक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. अशातच रुबिनाने चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. रुबिना दुसऱ्यांदा आई होणार आहे. इंस्टाग्राम एक स्टोरी शेअर करत तिने ही गोड बातमी दिलीये. त्यामुळे चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.