
twinkle khanna
esakal
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने ट्विंकल खन्ना हिच्याशी लग्नगाठ बांधली. तेव्हा अनेकांनी त्याला ट्रोलदेखील केलं होतं. त्याने राजेश खन्ना यांच्या पैशांसाठी तिच्याशी लग्न केल्याचं म्हंटलं. मात्र ते दोघेही त्यांच्या वैवाहिक आयुष्यात सुखी आहेत. त्यांची खोटी खोटी भांडणं आणि खरं प्रेम हे कायमच चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरतं. अभिनेत्री कायमच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसते. एका कार्यक्रमात तिने त्यांच्या लग्नाआधीचा मोठा किस्सा सांगितला होता. लग्नाआधी तिने अक्षयच्या काही मेडिकल टेस्ट केल्या होत्या. आपण त्या टेस्ट का केल्या होत्या याबद्दल तिने सांगितलंय.