बॉलीवुडमधील प्रसिद्ध गायक उदित नारायण यांची सद्धा जोरदार चर्चा रंगत आहे. एका महिला चाहतीला लिप किस केल्यामुळे उदित नारायण चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी स्पष्टीकरण देत चाहत्यांसाठी अशा गोष्टी कराव्या लागत असल्याचं म्हटलं आहे. अशातच उदित नारायण याचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये उदित श्रेया घोषालला किस करताना दिसत आहेत. ते पाहून अलका याग्निक सुद्धा थक्क झाली. उदित नारायण यांना अचानक किस करताना बघून सर्वांनाच धक्का बसला होता.