UJJWAL NIKAM REVEALS AJMAL KASAB STORY ON KBC 18
esakal
AJMAL KASAB CLAIMED HE CAME TO MEET AMITABH BACHCHAN: अमिताभ बच्चन यांचा लोकप्रिय शो 'कौन बनेगा करोडपती'मध्ये २५ सप्टेंबर रोजी खास सेलिब्रिटी शो रंगला होता. या भागात अभिनेता राजकुमार राव, अभिनेत्री वामिका गब्बी आणि सरकारी वकील उज्ज्वल निकम सहभागी झाले होते. त्यांचा 'प्रहार: द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी तिघांनी शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिघांनी शोमध्ये १२.५ लाख रुपये जिंकले. दरम्यान त्यांनी ही रक्कम जळगावच्या 'मनोबल' या दृष्टिहीन मुलांसाठी दान केली.