
Marathi Entertainment News : मराठी चित्रपटसृष्टीमध्ये वेगवेगळ्या संकल्पना आणि कथाबीज असलेले चित्रपट येत आहेत. त्यातील वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. 'बिन लग्नाची गोष्ट' या आधुनिक विचारसरणीचा आणि कौटुंबिक नातेसंबंधाची चौकट मोडणारा असा चित्रपट आहे. दिग्दर्शक आदित्य इंगळेने या चित्रपटातून एक नवीन विचार मांडलेला आहे.