Kajol & Prabhudeva : तामिळमध्ये सुपरहिट पण हिंदीमध्ये फ्लॉप; काजोल-प्रभुदेवाच्या 'त्या' सिनेमाची गोष्ट

अभिनेत्री काजोल आणि अभिनेता प्रभुदेवा २७ वर्षांनी एकत्र काम करणार आहेत. पण तुम्हाला माहितीये का? या दोघांनी या आधी एकत्र काम केलेला सिनेमा सुपरहिट झाला होता. जाणून घेऊया या सिनेमाविषयी खास गोष्टी.
Kajol and Prabhudeva
Kajol and PrabhudevaEsakal

अभिनेत्री काजोल आणि अभिनेता, दिग्दर्शक प्रभुदेवा २७ वर्षानंतर पुन्हा एकत्र काम करणार असल्याची चर्चा सगळीकडे आहे. त्या दोघांनी या आधी 'मिनसारा कनावू' या सिनेमात एकत्र काम केलं होतं. ही एक म्युझिकल फिल्म होती आणि ही फिल्म त्या काळी खूप गाजली होती.

मिनसारा कनावू या सिनेमात काजोलसोबत प्रभुदेवा आणि अरविंद स्वामी यांची मुख्य भूमिका होती. काजोलने यात नन बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुण मुलीची प्रियाची भूमिका साकारली होती तर प्रभुदेवाने एका हेअरस्टायलिस्टची भूमिका साकारली होती जो तिच्या प्रेमात पडतो. तर अरविंद स्वामी यांनी थॉमसची भूमिका साकारली होती जो सुद्धा प्रियाच्या प्रेमात आहे. लव्ह ट्रँगल, स्वप्न आणि गाणं यांची वेगळी गोष्ट या सिनेमात होती.

Kajol and Prabhudeva
Kajol & Prabhudeva : २७ वर्षांनंतर काजोल आणि प्रभुदेवा पुन्हा एकत्र; 'या' सिनेमात करणार काम

काजोल नाही तर प्रिया म्हणून केलेली 'या' अभिनेत्रीची निवड

पण तुम्हाला माहितीये का? काजोल नाही तर या सिनेमातील प्रिया या भूमिकेसाठी अभिनेत्री माधुरी दीक्षितची निवड करण्यात आली होती. पण नंतर काही कारणास्तव हा सिनेमा काजोलला ऑफर करण्यात आला. या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनसाठी जावेद जाफरीने प्रभुदेवाच्या भूमिकेला आवाज दिला होता तर काजोलला तामिळ येत नसल्यामुळे या सिनेमाचं तामिळ व्हर्जन अभिनेत्री रेवतीने डब केलं होतं. तर प्रभुदेवाला तामिळ येत असूनही अभिनेता विक्रमने देवाचं कॅरेक्टर तामिळमध्ये डब केलं होतं.

तमिळमध्ये सुपरहिट पण हिंदीमध्ये फ्लॉप

काजोल आणि प्रभुदेवाची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा तामिळ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला. यातील गाणी, कलाकारांचा अभिनय सगळयांना खूपआवडला . या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सिल्व्हर ज्युबिली केली पण हिंदीमध्ये या सिनेमाला अपेक्षित यश मिळालं नाही. 'सपने' या नावाने हा सिनेमा हिंदीमध्ये रिलीज करण्यात आला पण प्रेक्षकांकड्न या सिनेमाला थंड प्रतिसाद मिळाला. हिंदीत सिनेमा फ्लॉप ठरल्यामुळे सिनेमाचे दिग्दर्शक राजीव मेनन यांनी त्यांचे पुढील सिनेमे हिंदीमध्ये डब करणं बंद केलं.

Kajol and Prabhudeva
Kajol Daughter Nyasa : ' ज्यांनी जन्माला घातलं त्यांनाच...' लेकीनंही काजोलला दिलं जशास तसं उत्तर!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com