
Entertainment News: 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' शो 2013 मध्ये सुरु झाला. या शोला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दाखवली. या शोमध्ये उपसाना सिंह यांचा मोठा रोल होता. कपिल शर्माच्या आत्याचा रोल त्या निभावत होत्या. या रोलमध्ये त्या सगळ्यांच्या फेवरेटही बनल्या होत्या. परंतु काही महिन्यानंतर उपासना सिंह यांनी कॉमेडी नाईट्स विथ कपिल' हा शो सोडला. एका मुलाखतीमध्ये त्यांनी शो सोडण्याचं कारण सांगितलं आहे.