
Marathi Entertainment News : अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला वर्षपूर्ती होण्याच्या पार्श्वभूमीवर प्रभू श्रीरामांची महिमा सांगणारा व विचार मांडणारा ‘मिशन अयोध्या' हा चित्रपट २४ जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. भारताचा इतिहास, संस्कृती आणि आध्यात्मिकतेचा अभूतपूर्व संगम असणारा आर. के. योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित आणि समीर सुर्वे दिग्दर्शित ‘मिशन अयोध्या' चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा महंत रामगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार, ७ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथे पार पडला.