

URMILA KANETKAR
ESAKAL
मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कानेटकर गेली अनेक वर्ष इंडस्ट्रीमध्ये सक्रीय आहे. तिने अनेक चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारल्या. २००३ साली तिने 'तुझ्याविना' या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर तिने स्वतःच्या हिमतीवर या क्षेत्रात आपलं स्थान निर्माण केलं. 'काकण' चित्रपटातील तिची भूमिका प्रचंड गाजली. सोबतच 'दुनियादारी' चित्रपटातील तिच्या अभिनयाचं देखील कौतुक झालं. मात्र तिच्या व्यावसायिक आयुष्याची जितकी चर्चा झाली तितकीच चर्चा तिच्या वैयक्तिक आयुष्याची झाली. उर्मिला आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांच्या वैवाहिक आयुष्यात सारं काही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यावर आता उर्मिलाने मौन सोडलंय.