
लोकप्रिय मराठी अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक वेगळी छबी निर्माण केली. उषा यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही स्वतःचं स्थान निर्माण केलं. मराठी मालिकांमधील त्यांचं स्थान आजही तसंच आहे. कलाकार त्यांना आऊ म्हणून हाक मारतात. मात्र त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली ती म्हणजे 'पवित्र रिश्ता' या मालिकेने. 'पवित्र रिश्ता' या मालिकेत त्यांनी सुशांत सिंग राजपूत याच्या आईची भूमिका केली होती. सुशांतने काही वर्षांपूर्वी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. मात्र सुशांतने आत्महत्या केली नसल्याचं त्या आजही निक्षून सांगतात.