

USHA NADKARNI
ESAKAL
'पवित्र रिश्ता' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी कायम त्यांच्या कामामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. त्या छोट्या पडद्यावरील आणि मोठ्या पडद्यावरील खाष्ट सासू म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी प्रेक्षकांसमोर आपली एक वेगळी इमेज तयार केली. मराठीसोबतच हिंदीमध्येही त्यांचा दबदबा आहे. त्यांनी अनेक दाक्षिणात्य कलाकारांसोबतही कामं केली आहेत. त्या नेहमीच त्यांचे मुद्दे बिनधास्तपणे मांडतात. मात्र त्यांच्या कुटुंबाबद्दल फारसं कुणाला ठाऊक नाहीये. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या सुनेबद्दल सांगितलं आहे. त्यांच्या आणि तिच्या नात्याबद्दल त्या बोलल्या आहेत.